माझ्याविषयी
संगीत
मनातलं, उत्स्फूर्त!
“मनातलं काही” हे माझ्या मनात साठून राहिलेल्या विचारांना, भावना, आठवणी आणि अनुभवांना शब्दांत मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे.
आयुष्यातल्या काही गोष्टी अगदी साध्या असतात, पण त्या मनाला खूप काही शिकवून जातात. कधी एखादी आठवण, कधी एखादा प्रसंग, कधी एखाद्या व्यक्तीची भेट, तर कधी मनात उमटलेला एखादा विचार - अशाच छोट्या-छोट्या गोष्टी मला लिहाव्याशा वाटतात.
या लेखनातून माझ्या मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचावं, तुम्हाला त्यात तुमच्या आयुष्याची एखादी आठवण सापडावी, एखादा विचार मनाला स्पर्शून जावा किंवा फक्त काही क्षण छान वाटावेत - एवढीच इच्छा.
“मनातलं काही” म्हणजे माझ्या मनातून उमटलेले काही शब्द… कदाचित त्यात तुम्हालाही तुमचं काही सापडेल. ❤️
मनापासून, संगीत
काही सांगायचं असेल तर संपर्क करा — तुमचा संदेश वाचायला आवडेल.